मनपाने चाईल्ड कोविड केअर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:18+5:302021-05-19T04:18:18+5:30
विशेष रुग्णालय उभारण्याची गरज होती; पण वारंवार मागणी करून तसे झाले नाही. अकोल्यात ९०० च्या वर रुग्णांना कोरोनामुळे प्राण ...
विशेष रुग्णालय उभारण्याची गरज होती; पण वारंवार मागणी करून तसे झाले नाही. अकोल्यात ९००
च्या वर रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमावावे लागले. भविष्यात अशी परिस्थिती लहान बालकांवर ओढावू
नये तसेच आर्थिकदृष्ट्या सर्व दुर्बलांच्या लहान मुलांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी
यासाठी अकोला महापालिकेने झोननिहाय चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटलची सुरुवात करावी, अशी मागणी रश्मी देव यांनी सोमवारी मनपा आयुक्त निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देशात सर्वत्र लहान मुलांसमोर कोरोनाचे संकट समोर दिसत असताना किमान आता तरी लहान
मुलांसाठी झोननिहाय एक अशा एकूण पाच चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटलची स्थापना अकोला
महापालिकेने करावी. यासाठी दहा कोटी रुपयांचा विशेष निधी आयुक्तांनी राखीव ठेवावा.
या रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स, कोविड प्रसूती बेड्स, कोविड डायलिसिस बेड्स, आयसीयू
व्हेंटिलेटर व इतर सुविधा असावी. महापालिकेने प्रभागनिहाय बालरोग तज्ज्ञांची योग्य
मानधनावर नेमणूक करावी. औषधांचा साठा उपलब्ध करावा. तसेच शहरात नियमित स्वच्छता व
नियमित फवारणी करावी, अशी मागणीही रश्मी देव यांनी निवेदनातून केली आहे.