मनपात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:33+5:302021-01-19T04:21:33+5:30
क्षेत्रीय अधिकारी सापडेना! अकाेला : सर्वसामान्य अकाेलेकरांची कामे तातडीने निकाली काढण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने झाेन निहाय कार्यालयाचे गठन केले. ...
क्षेत्रीय अधिकारी सापडेना!
अकाेला : सर्वसामान्य अकाेलेकरांची कामे तातडीने निकाली काढण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने झाेन निहाय कार्यालयाचे गठन केले. त्याचा नागरिकांना काहीअंशी फायदाही झाला. परंतु मालमत्ता कर, पाणीपट्टी व अनधिकृत इमारतींच्या संदर्भात तक्रारीसाठी जाणाऱ्या नागरिकांना क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध हाेत नसल्याची परिस्थिती आहे.
जुना भाजीबाजारात अस्वच्छता
अकाेला : जैन मंदिर परिसरातील जुना भाजीबाजारात अत्यंत दाटीवाटीने भाजी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना रस्त्यातून वाट काढणे मुश्कील झाले असून साफसफाईअभावी ठिकठिकाणी अस्वच्छता पसरल्याचे चित्र पहावयास मिळते. या प्रकाराकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.
‘सिंधी कॅम्प रस्त्याची दुरुस्ती करा!’
अकाेला : शहरातील सिंधी कॅम्प रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहते. या मार्गावरील गुरुनानक विद्यालय ते खदान पाेलिस ठाण्यापर्यंतच्या अवघ्या ३०० मीटर मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सिंधी कॅम्पवासीयांनी केली आहे.
रस्त्याच्या मधात विद्युत खांब
अकाेला : भाजपचे आ. गाेवर्धन शर्मा यांच्या विकास निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम केले. परंतु या मार्गावरील विद्युत खांब अद्यापही जैसे थे असल्याने वाहनचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. सदरचे खांब त्वरित हटविण्याची गरज असून याकडे आ. शर्मा यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
अकाेटफैल चाैकात खाेदला खड्डा!
अकाेला : उत्तर झाेन अंतर्गत येणाऱ्या अकाेटफैल पाेलिस ठाण्यासमाेर मुख्य चाैकात जलवाहिनीच्या कामासाठी भला माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा खड्डा कायम आहे. दरम्यान, अकाेला ते अकाेट व अकाेला ते अमरावती जाण्यासाठी या मार्गावर वाहनांची गर्दी लक्षात घेता हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
रेल्वे क्वाॅर्टरची दुरवस्था
अकाेला : रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी अकाेटफैल परिसरात सुसज्ज रेल्वे क्वाॅर्टरची उभारणी करण्यात आली हाेती. परंतु मागील काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने निवाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी इतरत्र घरे घेतली. त्यामुळे बहुतांश क्वाॅर्टरची पडझड झाली आहे.
साेनटक्के प्लाॅटमध्ये सांडपाण्याची समस्या
अकाेला : जुने शहरातील अत्यंत दाट लाेकवस्तीचा भाग असलेल्या साेनटक्के प्लाॅटमध्ये नाल्यांची समस्या कायम आहे. नाल्या नसल्यामुळे रहिवाशांचे सांडपाणी परिसरातील खुल्या जागांमध्ये साचते. यामुळे डासांची पैदास वाढली असून दुर्गंधीमुळे रहिवाशांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे. या समस्येची प्रभागाचे नगरसेवक व मनपाचे आराेग्य निरीक्षक दखल घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.