Maratha Kranti Morcha : कौलखेड जहाँगीर येथे रास्ता-रोको; पळसो-मूर्तिजापुर मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:58 PM2018-07-24T14:58:15+5:302018-07-24T15:01:45+5:30
बोरगांव मंजू (जि. अकोला): सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कौलखेड जहाँगीर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलन छेडले.
लोकमत न्युज नेटवर्क
बोरगांव मंजू (जि. अकोला): सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कौलखेड जहाँगीर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलन छेडले. काकासाहेब दत्तात्रय शिंदे अमर रहे घोषणा देत मराठा आरक्षणासाठी मागणी करुण बोरगाव मंजु ठाणेदार यांना निवेदन सादर केले.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या अनुषंगाने मराठा समाज हा कायमच सर्वांच्या संकटसमयी संरक्षकाच्या भुमीकेत राहिला आहे. तर इतिहास साक्ष आहे. तर शासनाने कोणताही अंवलंब न करता त्वरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरावा आणि आरक्षण लागू करावे या मागणी साठी कौलखेड जहाँगीर बस थाब्यावर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन छेडले होते. दरम्यान, पळसो ते मूर्तिजापुर मार्ग बंद केला होता. यावेळी काही काळ दुतर्फा वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. आंदोलकांनी लाख मराठा, काकासाहेब अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही घोषणाबाजी केली. आंदोलनात सचिन तायडे,पंकज तायडे,रूपेश तायडे,रोहीत तायडे, याच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर ठाणेदार विजय मगर सह पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम धांडे, अरुण मदनकर, प्रवीण वाकोडे, अण्णा सोनकाबळे, किशोर गवळी यांनी अंदोलकांना शांत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.