Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण आंदोलनाची अकोल्यात धग; जिल्हा बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:42 PM2018-07-25T12:42:22+5:302018-07-25T12:44:12+5:30

अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

Maratha Kranti Morcha: response in akola district |  Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण आंदोलनाची अकोल्यात धग; जिल्हा बंदला प्रतिसाद

 Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण आंदोलनाची अकोल्यात धग; जिल्हा बंदला प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्दे या आवाहनास अकोला शहरासह जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे.सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले.

अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनास अकोला शहरासह जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. तर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी टायर पेटवून वाहतुक अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. बहुतांश मार्गांवरील बसगाड्या सुरु असल्याचे दिसून आले.



बोरगाव मंजू येथे रास्ता- रोको
बोरगाव मंजू : सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडे दहा वाजता रस्त्यावर आंदोलन छेडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर शहरातील शाळा, महाविद्यालयातुन विद्यार्थी आपल्या घरी शाळेतुन परत गेल्याचे चित्र दिसून आले. अंदोलकांनी एक मराठा- लाख मराठा, काकासाहेब शिंदे अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही , अशा घोषणा दिल्या. सकाळी शाळा, महाविद्यालये उघडण्यात आली होती; परंतु दहा वाजता नंतर विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी लगबग दिसुन आली. तर बस थांब्यावरील हॉटेल दुकाने बंद होती. आंदोलनात अजय देशमुख, गजानन देशमुख, योगेश बोधडे, धिरज देशमुख , संजय देशमुख, संजय पगारे, सोपान सारसे, चेतन राऊत, श्रीकांत देशमुख, महेश देशमुख, प्रशांत राऊत, याच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर ठाणेदार विजय मगर पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके , अरुण मदनकर, प्रवीण वाकोडे, पोलीसांनी अंदोलकांना शांत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, पोलीसांनी शांततेचे आवाहन करून चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Web Title: Maratha Kranti Morcha: response in akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.