Maratha reservation : भाजप पक्ष कार्यालयासमोर जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:16 PM2018-11-30T12:16:01+5:302018-11-30T12:16:29+5:30
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करताच भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी दुपारी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला.
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करताच भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुवारी दुपारी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
मुख्यमंत्र्यांनी मूळ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सभागृहात मांडले असता, त्याला चर्चेविना सर्व पक्षांनी मंजुरी दिली. त्यामुळे मराठ्यांना शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आरक्षण जाहीर करताच भाजपच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, रामदास तायडे, डॉ. किशोर मालोकार, धनंजय गिरधर, संजय जिरापुरे, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, नगरसेविका योगिता पावसाळे, सुमन गावंडे, शारदा ढोरे, रंजना विंचनकार, आरती घोगलिया, जान्हवी डोंगरे, अर्चना चौधरी, साधना ठाकरे, चंदा शर्मा, चंदा ठाकूर, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी, अजय शर्मा, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, विनोद मापारी, विलास शेळके, हरिभाऊ काळे, धनंजय धबाले, सागर शेगोकार, रणजित खेडकर, अनुप गोसावी, गणेश कंडारकर, नीलेश निनोरे, वसंता मानकर, प्रमोद देशमुख, विक्की ठाकू र, गजानन बाहेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप-शिवसेना युतीच्या घोषणा
१५ वर्षे सत्ता उपभोगणाºया तत्कालीन आघाडी सरकारने मराठा समाजाची अवहेलना केली. भाजप-शिवसेना युती सरकारने आरक्षणाची घोषणा करून मराठा समाजाला दिलासा दिल्याचे सांगत यावेळी भाजप-सेना युतीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.