Maratha Reservation : आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 19:14 IST2021-05-05T19:14:27+5:302021-05-05T19:14:37+5:30
Maratha Reservation: मराठा कार्यकर्त्यांनी बुधवार, ५ मे रोजी शहरातील सिव्हील लाईन चौकात निदर्शने केली.

Maratha Reservation : आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निदर्शने
अकोला : मराठा आरक्षण हे नियमबाह्य असल्याचे सांगत राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयानंतर मराठा कार्यकर्त्यांनी बुधवार, ५ मे रोजी शहरातील सिव्हील लाईन चौकात निदर्शने केली.सध्या जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करता येत नाही. त्यामुळे शहरातील सिव्हील लाईन चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चार जणांच्या उपस्थितीत निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या व संताप व्यक्त केला. यावेळी मराठा समाजाचे विनायकराव पवार, हेमंत देशमुख, संजय सुर्यवंशी व प्रतीक वाकडे सहभागी झाले होते.