वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषा विभाग सरसावला!

By admin | Published: September 28, 2016 01:30 AM2016-09-28T01:30:21+5:302016-09-28T01:30:21+5:30

पश्‍चिम व-हाडात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Marathi language department to cultivate reading culture! | वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषा विभाग सरसावला!

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषा विभाग सरसावला!

Next

वशिम, दि. २७- वाचन संस्कृती जोपासण्यासाठी राज्याचा मराठी भाषा विभाग सरसावला असून, याचा पहिला प्रयत्न म्हणून माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दृष्टिकोनातून पश्‍चिम वर्‍हाडात नियोजन केले जात आहे.
विविध कारणांमुळे पूर्वीच्या तुलनेत आता वाचन संस्कृती कमी होत असल्याचे दिसून येते. ह्यवाचाल तर वाचालह्ण ही म्हण केवळ पुस्तकापुरतीच र्मयादीत राहत असल्याचे वास्तव आहे. वाचन संस्कृतीला गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग प्रयत्नशील असल्याचे आहे. या प्रयत्नाचा पहिला भाग म्हणून माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ह्यवाचन प्रेरणा दिनह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेत किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात येणार आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने आपले स्नेही, मित्र, कुटुंबातील सदस्यांना किमान पुस्तक भेट द्यावे, अशी अपेक्षा मराठी भाषा विभाग बाळगून आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिवशी वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल, असे संदेश प्रसारित करण्याच्या सूचनाही मराठी भाषा विभागाने शासकीय-निमशासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्थांना दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्था आदिंनी व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामुहिक वाचन, ग्रंथप्रदर्शन यासह अन्य काही स्पर्धा असे उपक्रम राबविण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत.

Web Title: Marathi language department to cultivate reading culture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.