बाजार समितीत फक्त सोयाबीनचेच व्यवहार सुरळीत
By admin | Published: August 11, 2016 01:49 AM2016-08-11T01:49:52+5:302016-08-11T01:49:52+5:30
इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप.
अकोला, दि. १0: गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीचे व्यवहार दोन दिवसांपासून सुरू झाले, पण फक्त सोयाबीनचेच व्यवहार सुरू झाले आहेत. इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला जात आहे. शासनाच्या नव्या नियमाचे कारण पुढे करून गेल्या महिनाभरापासून व्यवहार ठप्प करण्यात आले होते. शेतकरी जागर मंचने जिल्हाधिकार्यांची भेट घेतल्यानंतर एक संयुक्त बैठक पार पडली. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पण, आता पुन्हा फक्त सोयाबीनच्याच खरेदीदारांनी व्यवहार सुरू केले असून, इतर धान्याच्या खरेदीदारांनी पूर्णपणे व्यवहार सुरळीत केले नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. तेव्हा बाजार समितीने पुन्हा अशा खरेदीदारांना समज देऊन अथवा कारवाई करून व्यवहार सुरळीत करण्याची शेतकर्यांची मागणी आहे.