बाजार समित्या सुरू ठेवा!- पणन संचालकांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:25 AM2020-05-16T10:25:19+5:302020-05-16T10:25:32+5:30

राज्यातील बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करण्याचा आदेश पणन संचालकांनी काढला आहे.

Market Committees Continue! - Order of Marketing Director | बाजार समित्या सुरू ठेवा!- पणन संचालकांचा आदेश

बाजार समित्या सुरू ठेवा!- पणन संचालकांचा आदेश

googlenewsNext

अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्यात सर्वत्र दक्षता घेऊन बाजार समित्यांचे कामकाज सुरू आहे; परंतु काही बाजार समित्या उपाययोजना न करता थातूरमातूर कारणे देऊन बंद ठेवण्यात आल्या आहेत. शेतकरी अडचणीत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना करून राज्यातील बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करण्याचा आदेश पणन संचालकांनी काढला आहे.
कोरोनाच्या या संकटात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्या सुरू ठेवणे, बाजार समित्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. असे असताना काही ठिकाणी ठोस कारणाशिवाय कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि कर्तव्यात कसूर दर्शविणारी आहे. याची जाणीव बाजार समित्यांच्या सर्व घटकांनी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट पुढील बरेच दिवस लांबू शकते. यामुळे दीर्घकाळ बाजार समित्या बंद ठेवल्यास शेतकरी आणि ग्राहक हे घटक अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीवरही विपरीत परिणाम होणार आहे. म्हणूनच शेतमालाचे व्यवहार व वाहतूक सुरू ठेवण्याबाबत केंद्र आणि राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. याबाबत बाजार समित्या संचालक मंडळ व समितीवरील शासनाचे प्रतिनिधी, सहायक व उपनिबंधक यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी काही ठोस कारणाशिवाय असहकार्य करीत असल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करू न कामकाज सुरू करणे अपेक्षित आहे. तथापि, जेथे आपल्या व्यवस्थापन कायद्यांतर्गत लेखी आदेश प्राप्त असेल, तेथे जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने उचित कारवाई करण्यात यावी, असेही पणन संचालक सुनील पवार यांनी म्हटले आहे.


- शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घ्या!
पावसाळा तोंडावर आला असून, शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया बाजार समित्यांचे संचालक मंडळ व प्रशासक सर्व घटकासह कोरोना प्रतिबंधक आवश्यक उपाययोजना करू न नियमित कामकाज सुरू ठेवावे.

 

Web Title: Market Committees Continue! - Order of Marketing Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.