‘पणन’ने थकवले ७०० कोटी रुपयांचे चुकारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:05 IST2020-03-01T14:04:58+5:302020-03-01T14:05:03+5:30
जुळवाजुळव न झाल्यास पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र बंद करावे लागणार असल्याचे वृत्त आहे.

‘पणन’ने थकवले ७०० कोटी रुपयांचे चुकारे
- राजरत्न सिरसाट
अकोला: महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने शेतकऱ्यांना आतापर्यंत १,८७८ कोटी रुपयांचे चुकारे केले आहेत; परंतु यातील ६८२ कोटी रुपये थकले आहेत. पणन महासंघाने बँकेकडून १,८५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते संपल्याने उर्वरित चुकाºयासाठी रकमेची जुळवाजुळव करावी लागत आहे. ही जुळवाजुळव न झाल्यास पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र बंद करावे लागणार असल्याचे वृत्त आहे.
पणन महासंघाने आजमितीस ५० लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. खरेदी केलेला हा कापूूस २,५६० कोटी रुपयांचा असून, शेतकऱ्यांना त्यातील १,८७८ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. पणन महासंघाच्या तारणावर बँकेने सुरुवातीला १,८५० कोटी रुपये कर्ज दिले होते. आता ही रक्कम संपल्याने उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ आहे. सद्यस्थितीत कापसाची आवक वाढली असून, थकलेले चुकारे देण्यासाठी पणन महासंघाला एक हजार कोटी रुपयांची गरज आहे. भारतीय कापूस महामंडळाचा पणन महासंघ उपअभिकर्ता आहे. करारानुसार ‘सीसीआय’ पणन महासंघाला १५ लाख क्ंिवटलच्यावर कमिशन देणार नाही. पणन महासंघाला शेतकºयांचे चुकारे अदा करण्यासह त्यांच्या कर्मचाºयांचा वेतन व प्रशासकीय खर्च करावा लागत असल्याने तातडीने रक्कम हवी आहे. दुसरीकडे यावर्षी विक्रमी कापूस खरेदी होत आहे. यामुळे पणन महासंघ आर्थिक अडचणीत सापडला आहे. पणन महासंघाची आर्थिक परवड बघता, शासनाने १,८०० कोटी रुपयांची गॅरंटी घेतली आहे. त्याचा किती फायदा होतो, याकडे कापूस उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
- खरेदी बंद करू नका, राजकीय दबाव!
पणन महासंघ आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे खरेदी केंद्र बंद करू नका, असा राजकीय दबाव असल्याचे पणनच्या संचालकांनी सांगितले.
‘पणन’ने यावर्षी १,८५० कोटी रुपये बँकेकडून कर्ज घेतले आहे. कापूस खरेदीपोटी शेतकºयांना २,५६० कोटी रुपये अदा करायचे आहेत. यातील १,८७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे लवकर शेतकºयांना दिले जाणार आहेत. म्हणून शेतकºयांची काळजी करू नये, कापूस विक्रीस आणावा.
- अनंतराव देशमुख,
अध्यक्ष,
पणन महासंघ.