विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, रायपूर येथील कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:27+5:302021-01-25T04:19:27+5:30

सिंधी कॅम्प येथील ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. २०१६ मध्ये येथील युवतीचा विवाह रायपूर येथील नितेश ...

Marriage case filed against family members in Raipur for dowry harassment | विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, रायपूर येथील कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, रायपूर येथील कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

सिंधी कॅम्प येथील ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. २०१६ मध्ये येथील युवतीचा विवाह रायपूर येथील नितेश अशोककुमार पंजवानी याच्यासोबत झाला होता. युवतीच्या आईवडिलांनी लग्नामध्ये २५ लाख रुपये खर्च केला होता. तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये कमी पैसे दिले, असे म्हणून पती मानसिक छळ करीत होता, तसेच सासरा अशोक कुमार खेमचंद पंजवानी घरगुती कारणांवरून, छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्रास देऊन शिवीगाळ करायचे. इतकेच नव्हे, तर सिगारेटचा धूरही तोंडावर उडवित असल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. असे असतानाही ३५ लाख रुपये दुकान सुरू करण्यासाठी व १५ लाख रुपये माल खरेदीसाठी माहेरहून आणण्याचा तगादा लावत असत व मानसिक छळ करीत, अशा तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरा, जेठ मनिष व दीर योगेश, नणंद रितु मनिष कुमार मेघानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Marriage case filed against family members in Raipur for dowry harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.