हिंगोली येथून निघालेले वऱ्हाडी लग्नाऐवजी पोहोचले पातूर पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:10 IST2021-02-22T13:08:05+5:302021-02-22T13:10:34+5:30
Akola News कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून रविवारी तीन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगोली येथून निघालेले वऱ्हाडी लग्नाऐवजी पोहोचले पातूर पोलीस ठाण्यात
पातूर : मराठवाड्यातील हिंगोली येथून निघालेले वऱ्हाड लग्नमंडपात पोहोचण्याऐवजी थेट पातूर पोलीस ठाण्याला पोहोचले. वऱ्हाडींना घेऊन येणाऱ्या तीन वाहनांवर कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून रविवारी तीन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली येथून तीन वाहने तालुक्यातील शिर्ला येथे लग्नासाठी ३९ वऱ्हाडी घेऊन नवरदेव निघालाहोते. रविवारी दुपारी पातूर पोलीस ठाण्यासमोरून वाहने जात असताना वाहतूक पोलिसांना दिसले. पोलिसांनी तीनही वाहनांवर कारवाई करीत वाहन पोलीस ठाण्याला जमा केले होते. दरम्यान, लग्न हा महत्त्वाचा भाग म्हणून नवरदेव व ३९ वऱ्हाडींना सोडून देण्यात आले; मात्र वाहन (एमएच ३८ एल २४९६)चे चालक यादव कानोजी फाळके (रा. जयपूर हिंगोली), वाहन (एमएच ३८, ७०५०)चे चालक रतन मोतीराम वैराट (रा. खंडाळा हिंगोली) आणि वाहन (एमएच ३८ एक्स १९३०) चालक पांडुरंग भिकाजी गाडे (रा. जयपूर, जि. हिंगोली) या तीनही वाहन चालकांविरुद्ध कलम १८८,२६९ नुसार कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला. (फोटो)