विवाहितेचा छळ; १0 जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: September 12, 2014 01:16 AM2014-09-12T01:16:08+5:302014-09-12T01:16:08+5:30

हुंड्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Marriage of persecution; Crime against 10 people | विवाहितेचा छळ; १0 जणांविरुद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ; १0 जणांविरुद्ध गुन्हा

Next

अकोला : हुंड्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री महिलेलच्या तक्रारीवरून पतीसह १0 जणांवर गुन्हा दाखल केला.
अमानखाँ प्लॉटमध्ये राहणारी प्रीती विनोद रगडे (२१) हिने दिलेल्या तक्रारीनुसार औरंगाबाद येथे राहणार्‍या विनोद नामक युवकासोबत काही वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती विनोद रगडे, सासू-सासर व इतर ७ जण तिला हुंड्याची मागणी करू लागले. ही मागणी पूर्ण होत नसल्याने आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला आणि तिची फसवणूक केली. तिच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८, ४१८, ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Marriage of persecution; Crime against 10 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.