पातूर येथील विवाहितेच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:29 PM2017-11-03T19:29:13+5:302017-11-03T20:12:22+5:30
पातूर : तालुक्यातील मळसूर येथील मृतक कविता जितेश पटेल (३0) हिचा ३0 ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विवरा फाट्याजवळील अंबाशी शिवारातील बेलतळाकडे जाणार्या रस् त्यावर जीवाने मारून मृतदेह आणून टाकल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : तालुक्यातील मळसूर येथील मृतक कविता जितेश पटेल (३0) हिचा ३0 ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विवरा फाट्याजवळील अंबाशी शिवारातील बेलतळाकडे जाणार्या रस् त्यावर जीवाने मारून मृतदेह आणून टाकल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जवळपास चार ते पाच दिवसांपासून पोलीस प्रशासनातील अधिकारी पातुरात तळ ठोकून होते. अखेर ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मृत महिलेची आई गिरिजा शंकर पारसकर (५४), राहुल शंकर पारसकर (२६), मामा दयाराम बुंदे (५५), मित्र अयुब बेग (२८) सर्व रा. मळसूर व चुलतभाऊ श्रीकृ ष्ण काशीराम पारसकर (३0) रा. सायवनी या सर्वांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य संशयितांची बयाणे नोंदविण्याचे काम सुरू आहे.
या घटनेबाबत सर्वप्रथम सीआरपीसीच्या १७४ कलमानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास केला. यातील मृतक कविता जितेश पटेल हिचे वाडेगाव येथील एका इसमासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले असल्याच्या कारणाने मृतकाच्या नातेवाइकांची बदनामी होत असल्यामुळे या तील पाचही आरोपींनी संगनमत करून जीवे मारण्याचा कट रचून दोरीने गळा आवळून, तोंड दाबून खून केला आहे, अशी फिर्याद सरकारतर्फे एपीआय प्रकाश लक्ष्मण झोडगे यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून पातूर पोलिसांनी या घटनेबाबत भादंविच्या ३0२ व १२0 (२), ३४ कलमान्वये पाचही आरो पींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पा तूरचे पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव करीत आहेत.
पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर उलगडले खुनाचे गूढ
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, बाळापूरचे उ पविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे कैलास नागरे व पातूरचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी परिश्रमपूर्वक शोध घेऊन परिश्रमानंतर अखेर पाचही आरोपींना अटक केली. त्यांनी या खुनाच्या किचकट प्रकरणाचा तपास लावण्यात यश मिळविले, हे विशेष.