विवाहित महिलेस पळविले; गुन्हा दाखल!
By admin | Published: February 24, 2017 01:59 AM2017-02-24T01:59:14+5:302017-02-24T01:59:14+5:30
अपहरणाची तक्रार; मंगरुळपीर तालुक्यातील बेलखेड येथील घटना
मंगरुळपीर, दि. २३- विवाहित महिलेस तिच्या मुलासह जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बेलखेड येथील फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली, की फिर्यादीची विवाहित मुलगी ही २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास तिच्या लहान मुलाला घेऊन मंगरुळपीर येथे दवाखान्यात जात असताना बेलखेड ते धोत्रा फाट्यादरम्यान ओमनी व्हॅन (क्रमांक एमएच ३0 पी १२४१) या वाहनातून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी आपल्या मुलीस व तिच्या लहान मुलास जबरदस्तीने वाहनात टाकून पळ काढला.
अशा आशयाच्या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध कलम ३६४, ३६६ अन्वये गुन्हा दखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
तथापि, भरदिवसा अपहरण करून महिलेस आणि तिच्या मुलास पळवून नेण्यापर्यंत संबंधित आरोपींची हिंमत झाली. अत्यंत गंभीर स्वरूपातील या घटनेमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात सापडल्याची बाब अधोरेखित होत आहे.