सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जाळून घेतले; तेल्हारा पोलिसांनी दाखल केला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:01 PM2018-03-06T18:01:53+5:302018-03-06T18:01:53+5:30
तेल्हारा : सासरच्या मंडळीकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगवी येथील विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मार्च रोजी घडली होती.
तेल्हारा : सासरच्या मंडळीकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगवी येथील विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी सासू, सासरा व पती यांच्याविरुद्ध ५ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
भाग्यश्री यांचा विवाह २०१४ मध्ये तेल्हारा तालुक्यातील सांगवी येथील अविनाश हिवरे यांच्याबरोबर झाला होता. भाग्यश्री यांचा लग्नाच्या सहा महिन्यांपासूनच सासरच्या मंडळीने माहेरून शेतीकामासाठी ५० हजार रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले होते. त्या छळाला कंटाळून भाग्यश्रीने १ मार्चला होळीच्या दिवशी राहत्या घरात जाळून घेतल्याचा आरोप भाग्यश्री यांचे वडील विनोद जांभुळकर यांनी ५ मार्च रोजी तेल्हारा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला होता. भाग्यश्री या ८० टक्के जळाल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपी अविनाश तेजराव हिवरे, सिंधु तेजराव हिवरे, तेजराव हिवरे रा. सांगवी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ५०४, ३४ दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय संतोष केदाशे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)