दोन तास मंगळ ग्रह चंद्रबिंबाआड लपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:56 AM2021-04-13T10:56:00+5:302021-04-13T10:57:52+5:30
Mars will hide behind the crescent moon : हा आकाश नजारा आपल्या भागात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होईल.
अकोला: आकाशात चंद्र, सूर्य यांच्या ग्रहणाचा आनंद अर्थात निसर्गातील हा सावल्यांचा खेळ आपण अधूनमधून अनुभवतो. १७ एप्रिल रोजी सुमारे दोन तास मंगळ ग्रह चंद्रबिंबाआड लपण्याची एक दुर्मिळ घटना घडणार आहे. याचा अनुभव आकाशप्रेमींनी अवश्य घ्यावा, असे आवाहन खगोलप्रेमी प्रभाकर दोड यांनी केले. पश्चिम आकाशात घडून येणारा हा आकाश नजारा आपल्या भागात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होईल. त्यावेळी सूर्य आकाशात असल्यामुळे हे मनोहारी दृश्य जसजसा संधी प्रकाश कमी होत जाईल आणि ७ वाजून ४५ मिनिटांनी लाल रंगाचा मंगळ ग्रह चंद्रबिंबाआडून बाहेर आलेला दिसेल. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा मंगळ ग्रह सध्या काहीसा दूर असला तरी अंधारलेल्या भागातून हा आकाश नजारा द्विनेत्री वा दुर्बिणीच्या माध्यमातून बघता येईल, असे प्रा. अभिजित दोड यांनी सांगितले.