मारवाडी युवा मंचची कोरोना रुग्णांसाठी मोफत भोजन सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:40+5:302021-05-18T04:19:40+5:30
........ मागासवर्गीयांचे आरक्षण, चर्मकार महासंघातर्फे आंदोलन अकोला : मागासवर्गीयांचे संपविलेल्या ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द करा ...
........
मागासवर्गीयांचे आरक्षण, चर्मकार महासंघातर्फे आंदोलन
अकोला : मागासवर्गीयांचे संपविलेल्या ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द करा या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने १८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदाेलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी केले आहे.
....................
मानधनावरील कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा
अकोला : महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांना फक्त तोंडी आदेशावर कामावर ठेवण्यात आलेले आहे. परंतु, मनपा आयुक्त अरोरा हे सदर कर्मचाऱ्यांना पुढील आदेश देण्यासाठी टाळाटाळ करीत असून, एक एनजीओ स्थापन करून त्या अंतर्गत या कर्मचाऱ्यांनी काम करावे असे तोंडी आदेश देत आहेत, अशी व्यथा या कर्मचाऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मांडून न्याय देण्याची मागणी केली.
ही व्यथा जाणून घेत आंबेडकर यांनी महानगरपालिका आयुक्त अरोरा यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पत्रानुसार मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची यादी ही शासनाकडे पाठवावी व त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. पुढील निर्णय येईपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मनपा गटनेते गजानन गवई, जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे यांच्यासह मनपातील मानधन तत्त्वावरील कर्मचारी बाळू घाटे, संतोष हर्षवाल, पंकज जैस्वाल, धीरेंद्र पवार, चंद्रकांत पुरके, विलास पहुरकर, संजय डोंगरे, शरद डोंगरे, मुस्तफा भाई, राजेंद्र गेडाम, अजमत खान पठाण, संतोष पाचपोर, राजीव भाई, गोपाल इंगळे, अनिल खिरोडकर, शेख जावेद रिजवान यांच्यासह मनपा मानधन तत्त्वावरील कर्मचारी उपस्थित होते.
.................
ना नफा, ना तोटा तत्त्वावर वाहनांना परवानगी द्या
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात खेड्यापाड्यातून गरीब महिला बाळंतपणासाठी येत असतात. मात्र शासनाच्या रुग्णवाहिका कोरोनामुळे सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गरोदर रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ना नफा, ना तोटा या तत्त्वावर गाड्या सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी यांना प्रबुद्ध भारत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध भारत बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सुधीर खाडे, प्रवीण इंगळे, सचिन घरडे, अमोल हमाने, आशिष तायडे, सुरेश खंडारे, राजू इंगळे, महेंद्र खंडारे, सचिन मंडवाले, धनराज वानखडे आदींची उपस्थिती होती.