महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार घ्यावा मसतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:11+5:302021-03-10T04:19:11+5:30
प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे समाजशास्त्र विभाग व ...
प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक तथा प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी त्या बाेलत हाेत्या कार्यक्रमात प्राचार्य मधुकरराव पवार, उपप्राचार्य डॉ. आर. आर. राठोड, डॉ. दीपिका जैन यांनी मार्गदर्शन झाले. प्रास्तविक समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक चौरपगार यांनी केले, सूत्रसंचालन कु. निकिता सरकटे हिने तर आभार प्रदर्शन वैशाली वाळके यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये प्रमुख्याने डॉ. सुधीर राऊत, डॉ. अनिल दडमल, डॉ. कैलास नागुलकर, प्रा.डी.एस राठोड, डॉ प्रवीणकुमार राठोड, प्रा आदित्य पवार, डॉ नीता कंकाळे,डॉ मनोज जाधव, प्रा. मोहन बल्लाळ, प्रा. संजय चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक विजय ढिसाळे, पंकज काळदाते, करण खाडे, आदित्य जामनिक, निकिता हमाने, अतुल दाभाडे तसेच पदवीधर व पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.