मास्क विक्रीत पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:15 AM2021-04-03T04:15:55+5:302021-04-03T04:15:55+5:30
अकोला : कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर विक्रीच्या प्रमाणात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना ...
अकोला : कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर विक्रीच्या प्रमाणात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता कायम राहत असल्याने एकमेव पर्याय म्हणून मास्कच वापरावा लागणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे मेडिकल तसेच रस्त्यांवरील विक्रेत्यांकडील मास्कचा खप दुपटीहून अधिक वाढला आहे.------------------------------------------------------
शेतशिवारात उष्णतेने शुकशुकाट
अकोला : जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापू लागल्याने वाढत्या तापमानामुळे दुपारी शेतशिवारात सर्वत्र शुकशुकाट राहत असल्याचे चित्र आहे. शेतकरी सकाळीच शेतीची कामे उरकून त्वरित माघारी फिरण्यावर भर देत आहे.
--------------------------------------------------------
केवळ एकच रातराणी सुरू
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी संख्या घटली आहे. नागरिक प्रवास टाळत असल्याने प्रवासी मिळत नाही. सद्यस्थितीत अकोला आगारातून पुणे येथे केवळ एकच रातराणी बस सुरू आहे.
----------------------------------------------------------
बसेस नादुरुस्त
अकोला : टायर नसणे व इंजीनमध्ये बिघाड झालेल्या अशा अनेक बसेस येथील मध्यवर्तीय आगारामध्ये उभ्या आहेत. त्यामुळे काही मार्गावर बसेसची संख्या कमी झाली आहे. लवकरच या बसेस रस्त्यावर धावतील, असे आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------------------------------------------------
आगारात सॅनिटाझेशन मशीन आवश्यक
अकोला : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेर जिल्ह्यातून शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आगारात सॅनिटायझेशन मशीन बसविणे गरजेचे बनले आहे.