अहमदनगर जिल्ह्यातील हत्याकांडाचा निषेध
By admin | Published: November 9, 2014 12:27 AM2014-11-09T00:27:29+5:302014-11-09T00:27:29+5:30
अकोला शहरातून काढली रॅली, जिल्हाधिकार्यांना निवेदन.
अकोला : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे (खालसा) येथील हत्याकांडाचा कायदा भीमाचा, जय जोशीबा क्रांती दल आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीची विद्यार्थी सेना यांनी निषेध केला आहे. लॉर्ड बुद्धा मैत्री संघ अशोक वाटिका प्रेरणा भूमी संघाने रॅली काढून निषेध केला. जवखेडे येथील जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
जवखेडे येथील हत्याकांडाचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. आरोपींच्या अटकेसाठी विविध सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही जवखेडे येथे जाऊन पीडित जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, हत्याकांडाचा निषेध पीरिपाच्या विद्यार्थी सेनेच्या प्राची सिरसाट यांनी निषेध केला. हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी डाबकी रोडवरील जय जोशीबा क्रांती दलाने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. पीडित कुटुंबाला ३0 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी क्रांती दलाने केली आहे. हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांती दलाचे संयोजक प्रमोद इंगळे यांच्यासह रोशन कोथळकर, अजय इंगळे, रोहित लामतुरे, आकाश सिरसाट, विजय हरणे, प्रशांत सिरसाट, अमित तायडे यांनी केली आहे. रिपब्लिकन सेनेने हत्याकांडाच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. सेनेने हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. आरोपींना अटक करावी, गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, पीडित कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.