अकोला MIDC तील फॅक्टरीला भीषण आग, लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:37 PM2020-05-19T22:37:30+5:302020-05-19T22:38:11+5:30
ऑइल जळून खाक
अकोला - एमआयडीसीमधील अप्पू पॉईंटजवळ असलेल्या जनरल ट्रान्सपोर्ट जवळील ऑइल कंपनीला आज रात्री आठ वाजता आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील ऑइल व इतर साहित्य जळाले असून त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
एमआयडीसीत मधील पप्पू पॉईंटवर जनरल ट्रान्सपोर्ट जवळच ऑइल कंपनी आहे. या कंपनीचे मालक रियाज खान (रा. खामगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी अकोला अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झाले. ऑइल जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तीन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. तसेच ही आग नेमकी लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.