सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 06:02 PM2022-04-17T18:02:51+5:302022-04-17T18:03:19+5:30

Massive fire at solar power project : निॲान व विधी कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली.

Massive fire at solar power project, burning millions of materials |  सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

 सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

Next

मूर्तिजापूर : तालुक्यातील रंभापूर शिवारात असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात शॉर्ट सर्किट मुळे दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागून ५० लाखांचेवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

          निॲान व विधी कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली, २० एकरावर असलेल्या प्रकल्पात सुरुवातीला आग लागली संपून गवताळ भाग असल्याने पहाता पहाता आगीने रौद्र रूप धारण धारण करुन बाजुलाच असलेल्या १० एकर क्षेत्रातील विधी प्रकल्पाला आपले लक्ष बनविले. दुपारी लागलेल्या आग प्रचंड प्रमाणात पसरली वृत्त लिहिस्तोवर संध्याकाळी ६ वाजता आग सुरुच होती ही रंभापूर गावापर्यंत पोहोचल्याने गावाला धोका निर्माण झाला आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीपोयोगी साहित्याची राख रांगोळी झाली आहे. या दोन्ही प्रकल्पात सौरऊर्जा निर्माण करुन ती कझंरा येथील पॉवर स्टेशनला पुरविल्या जाते तेथून हा वीज पुरवठा इतरत्र वितरीत करण्यात येतो. निअॉन प्रकल्पातील केबलचे ड्रम्स् व ट्रानफार्मर फुटून ३० ते ४० लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. तर विधी प्रकल्पातील प्लेट्स वाचल्याने कमी प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची माहीती कळताच माना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी मूर्तिजापूर व कारंजा नगरपरिषदेचे अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न करीत होते घटनास्थळी सरपंच प्रशांत इंगळे, मंडल अधिकारी राजेंद्र जाधव व माना पोलीस आग विझविण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने विशेष प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Massive fire at solar power project, burning millions of materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.