मनपा आवारात जप्त साहित्य बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:04+5:302021-01-14T04:16:04+5:30

खदानमुळे रहिवासू इमारतींना तडे अकाेला : सिंधी कॅम्प भागातील देवी खदानमुळे भागातील स्थानिक रहिवाशांच्या इमारतींना तडे जात आहेत. यामुळे ...

Materials seized in Municipal premises unattended | मनपा आवारात जप्त साहित्य बेवारस

मनपा आवारात जप्त साहित्य बेवारस

Next

खदानमुळे रहिवासू इमारतींना तडे

अकाेला : सिंधी कॅम्प भागातील देवी खदानमुळे भागातील स्थानिक रहिवाशांच्या इमारतींना तडे जात आहेत. यामुळे रहिवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. खदानमध्ये साचणाऱ्या घाण सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढली असून दुर्गंधीमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. खदान बुजविण्यासाठी मनपा प्रशासनाने उपाययाेजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

पार्किंगसाठी जागा उपलब्ध करा!

अकाेला : शहरात नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागते. वाहनचालकांना त्यांची वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करावी लागत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत असल्याने मनपाने पर्र्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी बुधवारी प्रवीण शिंदे यांनी मनपाकडे केली.

स्वच्छतागृहांमध्ये सुविधाच नाहीत!

अकाेला : महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी नसून अस्वच्छता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने स्वच्छतागृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

मनपात साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच खुद्द मनपाच्या विविध कार्र्यालयांत कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.

क्षयराेग विभाग वाऱ्यावर

अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारित मुख्य पाेस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे असल्याचे समाेर आले आहे. आवारभिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाेचालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. या ठिकाणी मनपाने चाैकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.

सिव्हिल लाइन चाैक ठरताेय जीवघेणा

अकाेला : शहरातील वर्दळीचा असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकपर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला असून सिव्हिल लाइन चाैकात उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या चाैकात रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.

उड्डाणपुलामुळे रस्त्यावर खड्डे

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे.

बेघर नागरिकांकडे मनपाचे दुर्लक्ष

अकाेला : शहरात जिल्हाधिकारी कार्र्यालयाची आवारभिंत, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. या ठिकाणी जेवण तयार करण्यासाेबतच अस्वच्छता पसरविली जात आहे. बेघर नागरिकांकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: Materials seized in Municipal premises unattended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.