जाळीचा देव यात्रेत देशभरातील भाविकांचा सहभाग
By admin | Published: February 13, 2017 04:36 PM2017-02-13T16:36:39+5:302017-02-13T16:36:39+5:30
अजिंठा मार्गावर बुलडाण्यापासून ३० किमी अंतरावर जाळीचा देव महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे.
बुलडाणा : देशभरातील महानुभाव सांप्रदायातील अनुयायांचे श्रद्धास्थान
असलेल्या जाळीचा देव येथे सध्या यात्रा सुरू आहे. या यात्रेत देशभरातील
अनुयायी सहभागी झाले आहेत.
बुलडाणा- अजिंठा मार्गावर बुलडाण्यापासून ३० किमी अंतरावर जाळीचा देव
महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी
यांनी बाराव्या शतकात भ्रमंतीवर असताना विश्रांती घेतली होती.
तेव्हापासून या ठिकाणी महानुभाव पंथीय अनुयायी दरवर्षी गोळा होतात. गत
काही वर्षांपासून येथे यात्रा उत्सव भरतो. या यात्रा उत्सवात देशभरातून
अनुयायी सहभागी होतात. सध्या येथे यात्रा सुरू असून, देशभरातून भाविक आले
आहेत. येथे धार्मिक वस्तूंसोबतच खेळणे व विविध साहित्याची दुकाने लागली
आहेत. यात्रा महोत्वात दररोज हजारो भाविक दर्शन घेत आहेत.