मातृ वंदना योजना : वाशिम जिल्ह्यात १४ हजार महिला लाभार्थींची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:37 PM2019-12-24T13:37:16+5:302019-12-24T13:37:47+5:30

वाशिम जिल्हयात या योजनेअंतर्गत १४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली असून या मध्ये ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे.

Matru Vandana Yojana: Registration of 14,000 women beneficiaries in Washim district | मातृ वंदना योजना : वाशिम जिल्ह्यात १४ हजार महिला लाभार्थींची नोंदणी

मातृ वंदना योजना : वाशिम जिल्ह्यात १४ हजार महिला लाभार्थींची नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मातृ वंदना योजनेंतर्गत जिल्ह्यातील १४ हजार लाभार्थी महिलांची नोंदणी झाली असून, ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत प्रथम गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर झाली असेल व त्यांनी शासनाने अधिकृत केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी करण्यात देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस ५ हजार एवढी रक्कम आधार सलंग्न बँक खात्यात किंवा पोस्ट आॅफिसमधील खात्यात तीन टप्यात दिली जाते. पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपये, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये, तिसरा हप्ता बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्ट चे ३ व ओपीव्ही च्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये देण्यात येईल.
ही योजना सध्या ग्रामिण क्षेत्राबरोबरच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये लागू आहे. वाशिम जिल्हयात या योजनेअंतर्गत १४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली असून या मध्ये ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Matru Vandana Yojana: Registration of 14,000 women beneficiaries in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम