मातृवंदना सप्ताहास सुरुवात : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’चा देणार संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:18 PM2019-12-02T15:18:57+5:302019-12-02T15:19:11+5:30
सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अकोला : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’ हे घोषवाक्य घेऊन सोमवार २ डिसेंबरपासून जिल्ह्यात मातृवंदना सप्ताहास सुरुवात होणार आहे. सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात २ ते ८ डिसेंबर या कालावधीत मातृवंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये मातांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सुपोषित जननी, विकसित धारिणी असा संदेशही दिला जाणार आहे. तसेच आरोग्य पोषण, स्वच्छता या बाबत तज्ज्ञ मातांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय, करेक्शन क्यू कमी करण्यासाठी विशेष मोहीम, दुसऱ्या व तिसºया हप्त्यासाठी पात्र लाभार्थींना त्वरित लाभ देण्यात येणार आहे.
घरोघरी जाऊन नवीन लाभार्थींची नोंदणी
मातृवंदना सप्ताहांतर्गत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन नवीन पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थींचे आधार कार्ड काढणे, बँक खाते काढणे असे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
मातृवंदना सप्ताहांतर्गत आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय, आशा स्वयंसेविकांमार्फत नवीन पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला