मे फ्लॉवर फुलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:49+5:302021-05-26T04:19:49+5:30
गुलमोहर गुलमोहर (शास्त्रीय नाव : डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे ...
गुलमोहर
गुलमोहर (शास्त्रीय नाव : डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे नाव आहे. हा मूळचा मादागास्करचा आहे. गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.
बहावा
बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात. बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.
रेन लिली
रेन लिलीचे शास्त्रीय नाव झेफिरेन्थेस आहे. हे कंदवर्गीय फुल असून याचा प्रसार मुख्यतः उ. गोलार्धातील समशीतोष्ण कटीबंधात आहे. लिलींच्या पुष्कळ जातींची शोभेसाठी लागवड करतात. या हिमालयातील उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यात व दक्षिण भारतात डोंगराळ भागात आढळतात. बऱ्याच विदेशी जाती व प्रकार भारतात उद्यानांत लावतात त्यांचे आकार-प्रकार, फुलांचे रंग, सुवास व काहींची उपयुक्तता यामुळे यांचे महत्त्व वाढत आहे.
मिनीरूट
मिनीरुटचे शास्त्रीय नाव रुवेलिया ट्यूरोरोसा हे आहे. रुवेलिया ट्यूरोरोसा याला मिनीरूट, ताप रूट, स्नॅपड्रॅगन रूट आणि मेंढी बटाटादेखील म्हणतात, ही फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. त्याची मूळ श्रेणी मध्य अमेरिकेत आहे. परंतु सध्या उष्णदेशीय दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियाच्या बऱ्याच देशांमध्ये ती नैसर्गिकरीत्या बनली आहे. याला कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
मंकी टेल
मंकी टेल याचे शास्त्रीय नाव क्लेस्टोकॅक्टस कोलाडेमोनोसीस हे आहे. हे निवडुंग जातीचे आहे. मंकी टेल हे सामान्य नाव केसाळ देठांच्या देखाव्यास सूचित करते. हा एक पायथ्यावरील जोमदार, एपिलिथिक (खडकांवर वाढणारा) निवडुंग आहे. प्रथम सरळ, नंतर लंब आणि ८.२ इंच लांब असतो.
बर्ड नेस्ट निवडुंग
बर्ड नेस्ट निवडुंग याचे शास्त्रीय नाव मॅमिलरीया लॉब्गीममा हे आहे. याला लहान फुले येतात. कमी पाण्यात आणि कोरड्या मातीत हे फूल येते. हे फूल उन्हाळ्यात फुलते. या फुलाचा रंग हा पिवळा असतो. याचा आकार लहान असतो.
क्रोन ऑफ थोर्न
क्रोन ऑफ थोर्न या फुलाचे शास्त्रीय नाव युफोरबीया मिली हे आहे. हे उन्हाळ्यात फुलणारे फूल आहे. ही फुले वर्षभर झाडाला राहतात. याला पाणीदेखील कमी लागते. हा मूळचा मादागास्करचा आहे. यातून वर्षभर फुलांचे उत्पादन होते.