महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी

By admin | Published: February 4, 2017 02:33 AM2017-02-04T02:33:48+5:302017-02-04T02:33:48+5:30

इच्छुकांमध्ये होणार घमासान; सर्वांंनाच अकोला महापौर पदाची समान संधी

Mayorship for the open category | महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी

महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी

Next

अकोला, दि. 0३- महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, यंदा प्रथमच अकोल्याचे महापौरपद खुला सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे. त्यामुळे साहजिकच महापालिकेच्या राजकारणात दबदबा कायम ठेवणार्‍या दिग्गजांमध्ये घमासान रंगण्याची चिन्हं आहेत.
महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामात सर्वच राजकीय पक्ष, स्थापन झालेल्या आघाड्या व अपक्ष उमेदवार विजयी होण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. सद्यस्थितीत मनपात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली तरी यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढणे पसंत केले. हाच कित्ता काँग्रेस-राष्ट्रवादीने गिरवत परस्परांविरोधात दंड थोपटले आहेत. मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्ष व्यूहरचना आखत असतानाच ३ फे ब्रुवारी रोजी मुंबईत महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महापौरपदाचे आरक्षण लक्षात घेता, यावेळी अनुसूचित जाती पुरुष किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची अपेक्षा होती. यंदा अकोल्याचे महापौरपद खुला सर्वसाधारण प्रवर्ग निघाले आहे. त्यामुळे सर्वच प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, हे तेवढेच खरे.

महिलांचीही दावेदारी कायम
राज्यातील २७ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, यापैकी १४ ठिकाणचे महापौरपद महिलांसाठी राखीव निघाले आहे. निवडणुकीत ८0 जागांपैकी ४0 जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला नगरसेविकांनी ४0 चा आकडा ओलांडल्यास यंदादेखील महिलांना महापौरपदाची सुवर्णसंधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेने राजकीय पक्षांकडून चाचपणी केली जात आहे.

Web Title: Mayorship for the open category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.