‘एमबीबीएस’ पाचव्या बॅचसाठी ५0 जागांना मान्यता
By admin | Published: June 10, 2017 02:01 PM2017-06-10T14:01:33+5:302017-06-10T14:01:33+5:30
‘एमसीआय’ची मान्यता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे केले होते निरीक्षण
एमसीआयची मान्यता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे केले होते निरीक्षण
अकोला : सन २0१७ व १८ या वर्षासाठी ह्यएमबीबीएसह्णच्या पाचव्या बॅचच्या ५0 विद्यार्थ्यांच्या प्रवेशित जागांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काही महिन्यांपासून निरीक्षण केले होते. वैद्यकीय महाविद्यालयाने ह्यएमसीआयह्णचे निकष पूर्ण केल्यामुळे मान्यता मिळाली असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएसच्या १00 जागांसह सुरू झाले होते. त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने २0१३ मध्ये एमबीबीएसच्या आणखी ५0 जागा वाढवून दिल्या. त्यासाठी दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयाला या ५0 वाढीव जागांसाठी एमसीआयची मान्यता घ्यावी लागते. यावर्षी या जागांना मान्यता देण्यापूर्वी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या चमूने वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाने एमसीआयचे निकष पूर्ण केल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला यंदा पाचव्या बॅचच्या ५0 विद्यार्थ्यांच्या जागांना एमसीआयने पुढील पाच वर्षांसाठी मान्यता प्रदान केली आहे. इंडिया टुटे घेतलेल्या सर्वेक्षणामध्येसुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाने उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून देशातून सहावा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्राप्त केला होता. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिली. (प्रतिनिधी)