राज्यात दारूची अवैध विक्री करणा-यांवर ‘मकोका’

By admin | Published: April 11, 2017 02:23 AM2017-04-11T02:23:42+5:302017-04-11T02:23:42+5:30

‘ऑपरेशन क्रॅक डाउन’; गृहमंत्रालयाकडून हालचाली.

'MCOCA' on illegal sale of alcohol in the state | राज्यात दारूची अवैध विक्री करणा-यांवर ‘मकोका’

राज्यात दारूची अवैध विक्री करणा-यांवर ‘मकोका’

Next

सचिन राऊत
अकोला: दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. १ ते २0 एप्रिल या कालावधीत देशी आणि विदेशी दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर वारंवार कारवाई झाल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोकानुसार) कारवाई करण्यात येणार आहेत. दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिसांच्या "ऑपरेशन क्रॅक डाउन"मध्ये दारू विक्रेत्यांचा अहवाल तयार करण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५00 मीटर अंतरावर असलेले वाइन बार, वाइन शॉप बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ८0 टक्के वाइन बार आणि दुकाने बंद झाल्याने दारूची अवैध वाहतूक आणि विक्रीला उधाण आले असतानाच अशा विक्री आणि वाहतुकीला रोखण्यासाठी पोलिसांकडून ह्यऑपरेशन क्रॅक डाऊनह्ण राबविण्यात येत आहे. दारूची अवैध विक्री करणार्‍यांचे कंबरडे मोडण्यासाठी दारू विक्रेत्यांवर मकोका कारवाई करण्याचेही गृहमंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. जिल्हय़ात २५१ परवानाधारक वाइन बार आणि वाइन शॉप होते; मात्र यामधील २२२ वाइन बार आणि वाइन शॉप एक एप्रिलनंतर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ २९ वाइन बार आणि वाइन शॉप जिल्हय़ात सुरू आहेत. राज्यात देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी तातडीने हालचाली करीत एकपेक्षा जास्त वेळा कारवाई झालेल्या दारू विक्रेत्यांवर मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. ह्यऑपरेशन क्रॅक डाऊनह्णअंतर्गत दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑपरेशन क्रॅक डाउन अंतर्गतच राज्यभरात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा सपाटा सुरू लावला आहे.
 
११ ते २0 एप्रिलमध्ये होणार प्रस्ताव
दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री करणार्‍या लोकांचा प्रस्ताव ११ ते २0 एप्रिलदरम्यान तयार करण्यात येणार आहे. ज्या लोकांवर वारंवार कारवाई झाली, त्यांच्यावर तातडीने मकोका दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. पोलीस खात्याकडून अशा लोकांची यादी तयार करण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे.

Web Title: 'MCOCA' on illegal sale of alcohol in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.