मानवाधिकार सुरक्षा संघाकडून गरजूंना जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:00+5:302021-05-19T04:19:00+5:30
संसर्गजन्य काेराेना विषाणूचे संकट कमी हाेण्याची काेणतीही चिन्हे दिसत नसून दिवसेंदिवस काेराेनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात ...
संसर्गजन्य काेराेना विषाणूचे संकट कमी हाेण्याची काेणतीही चिन्हे दिसत नसून दिवसेंदिवस काेराेनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेकांचे लहान-माेठे व्यवसाय पूर्णत: विस्कळीत बनले आहेत. उद्याेग, व्यवसाय व इतर कामे बंद पडल्यामुळे दैनंदिन मजुरी करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्यांची उपासमार हाेत आहे. गरीब नागरिकांवर ओढवलेले संकट लक्षात घेता, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्यावतीने मदतीचे हात सरसावले आहेत. संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रुती काटाेलकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरासह इतर भागातील गरजू नागरिकांना जेवणाची पाकिटे वितरित करण्यात आली़ गतवर्षीही काेराेनाच्या संकटात मानवाधिकार सुरक्षा संघाच्यावतीने शहरातील गरजू नागरिकांना जेवण व इतर साहित्याची मदत देण्यात आली हाेती.