डेंग्यूच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

By Admin | Published: November 6, 2014 01:03 AM2014-11-06T01:03:40+5:302014-11-06T01:03:40+5:30

अकोला जिल्ह्यात पथकांचे गठन, मेडिक्लोरचा पुरवठा, साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित.

Measures to control dengue | डेंग्यूच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

डेंग्यूच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

googlenewsNext

अकोला - शहरासह जिल्हय़ात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढले असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वातावरणातील बदल तसेच दूषित पाण्यामुळे आणि डासांच्या वाढलेल्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, टायफाइड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण अशा प्रकारचे जलजन्य व कीटकजन्य आजाराने थैमान माजविले आहे. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून, नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Measures to control dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.