प्रभाव लोकमतचा : आता प्राथमिक तपासणीनंतरच वैद्यकीय प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:54 AM2020-07-04T10:54:04+5:302020-07-04T10:54:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : राज्यांतर्गत प्रवासासाठी लागणाऱ्या आॅनलाइन पासकरिता वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असते. सर्वोपचार रुग्णालयात हे प्रमाणपत्र कुठलीही ...

Medical certificate only after preliminary examination! | प्रभाव लोकमतचा : आता प्राथमिक तपासणीनंतरच वैद्यकीय प्रमाणपत्र!

प्रभाव लोकमतचा : आता प्राथमिक तपासणीनंतरच वैद्यकीय प्रमाणपत्र!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यांतर्गत प्रवासासाठी लागणाऱ्या आॅनलाइन पासकरिता वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असते. सर्वोपचार रुग्णालयात हे प्रमाणपत्र कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून शुक्रवारी उघडकीस आणला. या वृत्तानंतर जीएमसी प्रशासन जागे झाले असून, प्राथमिक आरोग्य तपासणीनंतरच संबंधित व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे.
सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी न करता येणाºया प्रत्येक व्यक्तीला थेट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने शुक्रवारी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणला.
या वृत्तानंतर आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून, आता वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येणाºया प्रत्येक व्यक्तीची नोंद आणि त्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी केली जात आहे.
शिवाय, ती व्यक्ती हजर असेल, तरच त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे आता ज्या व्यक्तीला जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असेल, तर वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी त्याला सर्वोपचार रुग्णालयात हजर राहावे लागणार आहे.


असा केला बदल

  • येणाºया प्रत्येक व्यक्तीची आधारकार्ड बघून नोंद केली जाते.
  • नोंद झाल्यावर संबंधित व्यक्तीचा ताप मोजण्यात येते.
  • त्याला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, हे देखील तपासले जाते.
  • व्यक्ती हजर नसेल तर त्याला प्रमाणपत्र दिले जात नाही.
  •  
  • स्टिंग आॅपरेशनपूर्वीची स्थिती
  • केवळ नावाची नोंद करून दिले जात होते वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • कोरोनाच्या लक्षणांची तपासणीही होत नव्हती.
  • व्यक्तीच्या शरीराचे तापमान तपासले जात नव्हते.
  • व्यक्ती हजर नसेल, तरीही एकाच व्यक्तीला इतरांचेही वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात होते.

 

Web Title: Medical certificate only after preliminary examination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.