ब्रीथ ॲनालायझर धूळखात तळीरामांची वैद्यकीय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:45+5:302021-02-10T04:18:45+5:30
२०१९ ०५ २०२० ३६ अकाेला : देशभर मार्च ...
२०१९ ०५
२०२० ३६
अकाेला : देशभर मार्च २०२० मध्ये काेरानाचे संकट आल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या उपाययाेजना सुरू असतानाच तळीरामांची तपासणी करण्यासाठी असलेल्या ब्रीथ ॲनालायझरचा उपयाेगही बंद करण्यात आला हाेता. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे पोलिसांनाही अडचणीचे झाले असतानाच वाहतूक शाखेने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामांची सर्वाेपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीत त्यांच्यावर कारवाई केली.
ब्रिथ ॲनालायझरचा उपयोग बंद झाल्याने कोण दारू पिऊन आहे, याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. मात्र अकोला पोलिसांच्या वाहतूक शाखेने तळीरामांची सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीत त्यांच्यावर कारवाई केली आहे. २०२० या वर्षात कडक लाॅकडाऊन असतानाही वाहतूक शाखेने तब्बल ३६ तळीरामांवर कारवाई केली, तर त्याउलट २०१९ मध्ये केवळ ०५ कारवाया झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्रंक अँड ड्राइव्हवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी तळीरामांची वैद्यकीय तपासणी करण्याचा अनोखा फंडा वापरत त्यांच्यावर नियंत्रण मिळविल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे.
२०१९ -
जानेवारी - निरंक
फेब्रुवारी - निरंक
मार्च - निरंक
एप्रिल - निरंक
मे - निरंक
जून - निरंक
जुलै - निरंक
ऑगस्ट - निरंक
सप्टेंबर - निरंक
ऑक्टोबर - निरंक
नोव्हेंबर - निरंक
डिसेंबर - ०५
एकूण - ०५
२०२० -
जानेवारी - ०४
फेब्रुवारी - ०२
मार्च - १५
एप्रिल - निरंक
मे - निरंक
जून - निरंक
जुलै - निरंक
ऑगस्ट - निरंक
सप्टेंबर - निरंक
ऑक्टोबर - निरंक
नोव्हेंबर - ०४
डिसेंबर - ११
एकुण - ३६
काेट
कोरोना काळात ब्रीथ ॲनालायझरचा वापर बंद होता, परंतु अकोला पोलिसांनी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. २०१९ या वर्षातील कारवायांपेक्षा २०२० मध्ये अधिक कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
गजानन शेळके
वाहतूक शाखा प्रमुख
काेराेना काळात ३६ कारवाया
काेराेनाचे संकट असतानाही दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेने तब्बल ३६ तळीरामांवर कारवाइ केली. ब्रीथ ॲनालायझरचा उपयाेग बंद असताना पाेलीसांनी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
दारूचा खप वाढला
काेराेना काळात दारूचा खप अनधिकृतरीत्या माेठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती आहे. बरेच दिवस वाइन बार आणि शाॅप बंद असल्याने काळ्या बाजारात अधिक दराने दारूची दुपटीने विक्री झाल्याची माहिती आहे. काही बारचालकांनी तर भिंत ताेडून दारूविक्री केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.