राज्यातील आदिवासी भागात मिळणार वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:31 PM2018-12-28T13:31:25+5:302018-12-28T13:31:46+5:30
- प्रवीण खेते अकोला : आदिवासी भागातील रिक्त वैद्यकीय पदांवर बंधपत्रित उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या संचालकांनी ...
- प्रवीण खेते
अकोला: आदिवासी भागातील रिक्त वैद्यकीय पदांवर बंधपत्रित उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या संचालकांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील आदिवासी भागात लवकरच वैद्यकीय अधिकारी मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पद नागपूर आणि अकोला विभागाला मिळणार आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे राज्यातील आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली झाली आहे. आदिवासींना निरंतर आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यातील अकोला, कोल्हापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, ठाणे आणि लातूर या आठ विभागातील ७८ रिक्त पदांवर बंधपत्रित वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. या संदर्भात आठही आरोग्य सेवा परिमंडळाच्या सर्वच उपसंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र ठरलेल्या वैद्यकीय अधिकाºयांना संबंधित विभागातील आदिवासी भागातील आवश्यकतेनुसार रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात येणार आहे. पदस्थापना झाल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाºयास नेमणुकीच्या ठिकाणीच बंधपत्र कालावधीत अखंडित सेवा देणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे राज्यातील दुर्लक्षित आदिवासी विभागात लवकरच आरोग्य सेवा मिळणार आहे.
विभागनिहाय पदस्थापना
विभाग - एकूण पदे
अकोला - १६
नागपूर - १८
कोल्हापूर - ३
पुणे - ८
औरंगाबाद - ११
नाशिक - १०
ठाणे - ५
लातूर - ६
--------------------------
एकूण - ७८
पद रिक्त राहण्याची शक्यता
आरोग्य सेवा संचालनालयाने राज्यातील ७८ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांना बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; परंतु यातील बहुतांश उमेदवार पर्यायी मार्ग निवडण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली आहे.
पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातर्फे निर्देश दिले. त्यामुळे आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत मिळेल; परंतु अनेक उमेदवार पर्याय मार्ग निवडण्याची शक्यता असते.
- डॉ. व्ही. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला परिमंडळ