वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी कोविड रुग्णालयात भागीदारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 10:59 AM2020-10-07T10:59:23+5:302020-10-07T10:59:36+5:30
Akola Municipal Corporation खासगी रुग्णालयात मनपातील काही वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहरातील अनेक डॉक्टरांनी कोविड सेंटर उघडण्याला प्राधान्य दिले आहे. कोरोनाची लागण झालेल्या काही डॉक्टरांनी उभारलेल्या खासगी रुग्णालयात मनपातील काही वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णसेवेचा आव आणत असतानाच दुसरीकडे खुद्द वैद्यकीय अधिकाºयांनीच दुकानदारी थाटली असून, याप्रकरणी मनपा प्रशासन अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.
कोरोनाची साथ कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहरातील काही डॉक्टरांनी एकत्र येत खासगी सेंटर उभारण्याला प्राधान्य दिले. साहजिकच यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही संबंधित डॉक्टरांसोबत खासगी कोविड सेंटरमध्ये मनपातील काही वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांची भागीदारी असल्याची माहिती आहे. रुग्णसेवेचा आव आणणाºया महापालिकेकडून कोविडच्या नावाखाली दुकानदारी केली जात असल्याने प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कोविड सेंटरच्या प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार
हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना आहे. ही बाब लक्षात घेता खासगी कोविड सेंटर उभारण्यासाठी अनेक डॉक्टर सरसावले असून, त्यांच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिकेतील काही वैद्यकीय अधिकारी पुढाकार घेत असल्याची माहिती आहे.
वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. खासगी कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा