वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरोग्य उपसंचालकांची परवानगी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:56 PM2019-03-22T15:56:35+5:302019-03-22T15:56:56+5:30
अकोला: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता नियमित तीन वर्षांची वैद्यकीय सेवा तसेच आरोग्य उपसंचालकांची लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.
अकोला: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता नियमित तीन वर्षांची वैद्यकीय सेवा तसेच आरोग्य उपसंचालकांची लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. ही परवानगी प्रवेश परीक्षेला बसण्यापूर्वीच बंधनकारक असणार आहे.
राज्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवेत कार्यरत गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. यापूर्वी या अधिकाºयांना केवळ सीईटी परीक्षा उत्तीर्ण गुणांवर प्रवेश मिळायचा; परंतु २०१७ पासून सामाईक परीक्षेऐवजी राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती. यंदा या नियमावलीत आणखी बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवेश परीक्षेला बसण्यापूर्वीच आरोग्य सेवा परिमंडळाच्या उपसंचालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. उपसंचालकांची परवानगी न घेतल्यास संबंधित सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाºयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कार्यमुक्त करण्यात येणार नसल्याचेही नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती विहित पद्धतीने असणे गरजेचे असून, सेवा कालावधी तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
तर तो अधिकारी प्रवेशास अपात्र
नवीन नियमानुसार, वैद्यकीय अधिकाºयांनी मुख्यालयी राहून सेवा देणे आवश्यक आहे. या काळात संबंधित वैद्यकीय अधिकाºयांच्या अनुपस्थितीत गंभीर रुग्णावर उपचार झाले नाहीत, शवविच्छेदन झाले नाही, अशी एकही घटना झाली असल्यास किंवा संबंधित अधिकाºयाविरुद्ध विभागीय चौकशी झाली असल्यास तो अधिकारी प्रवेश परीक्षेसाठी अपात्र ठरणार आहे.
दुर्गम भागातील अधिकाºयांना ३० वाढीव गुणांचा लाभ
सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाºयांना त्यांच्या अतिदुर्गम, दुर्गम व ग्रामीण भागात केलेल्या सेवेबद्दल वाढीव गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक वर्षासाठी दहा गुण असे जास्तीत जास्त ३० गुण वाढवून दिल्या जातील.
पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी अधिकाºयांना परवानगी घेऊनच प्रवेशासाठी अर्ज केला आहे. दुर्गम भागातील अधिकाºयांना ३० गुण वाढीव मिळणार असल्याने, अशा अधिकाºयांना त्याचा फायदा होणार आहे.
- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.