भाजप बूथ प्रमुखांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:33+5:302021-02-09T04:21:33+5:30
यावेळी मध्य मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख आदी उपस्थित होते. डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी अकाेला : नायगाव येथे ...
यावेळी मध्य मंडळाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख आदी उपस्थित होते.
डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी
अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डम्पिंग ग्राऊंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. अनेकदा कचऱ्याला आग लागते. दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे हवा प्रदूषित झाली असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.
जलकुंभातून पाण्याची नासाडी
अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात मनपाचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपूलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरूस्त असल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेताे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
नालीची उंची कमी करा!
अकाेला : अग्रेसन चाैकासमाेर क्रीडा संकुलकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रूंदीकरणाच्या कामात माेठी नाली खाेदण्यात आली. सिमेंट नालीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नालीची उंची वाढल्यामुळे रामदास पेठ, सांस्कृतिक भवनकडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. नालीची उंची कमी करा,अन्यथा याठिकाणी मुरूमाचा भराव घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
बेघर नागरिक पुन्हा रस्त्यावर
अकाेला: शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी मनपाने निवारा उभारला आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजिनक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. मनपाने बेघर नागरिकांना निवाऱ्यात दाखल करण्याची मागणी प्रकर्षाने समाेर आली आहे.
रस्त्याची दुरूस्ती आटाेपली
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला हाेता. पावसात या रस्त्यावर ठिकठिकाणी ठिगळ पडले. माजी उपमहापाैर वैशाली शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण करण्यात आली. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
रस्त्यावरील ‘स्पीड ब्रेकर’कमी करा!
अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबाेळातील रस्त्यांवर नागरिकांनी मनमानरीत्या गतिराेधक बसविले आहेत. गतिराेधक नेमक्या किती मीटर अंतरावर असावेत ,याविषयी बांधकाम विभागाचे निकष आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी गतिराेधक उभारल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे गतिराेधक काढण्याची मागणी मनपाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.