शहर, जिल्हा काँग्रेसच्या निवडणुकीबाबत २६-२७ ला  बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 07:33 PM2017-09-24T19:33:38+5:302017-09-24T19:34:01+5:30

अकोला : अकोला शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  संघटनात्मक निवडणुकीबाबत २६ आणि २७ सप्टेंबर असे  सलग दोन दिवस, स्थानिक स्वराज्य भवनात बैठक होणार  आहे. या बैठकीचा आढावा बिहारचे आमदार आणि  अकोला जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  राजेशकुमार घेणार आहेत. दोन्ही दिवस सकाळी ११ वाजता  होणार्‍या या बैठकीला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Meeting of the District, District Congress on 26-27 | शहर, जिल्हा काँग्रेसच्या निवडणुकीबाबत २६-२७ ला  बैठक

शहर, जिल्हा काँग्रेसच्या निवडणुकीबाबत २६-२७ ला  बैठक

Next
ठळक मुद्देबिहारचे निवडणूक अधिकारी घेणार स्वराज्य भवनात  आढावाकाँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  संघटनात्मक निवडणुकीबाबत २६ आणि २७ सप्टेंबर असे  सलग दोन दिवस, स्थानिक स्वराज्य भवनात बैठक होणार  आहे. या बैठकीचा आढावा बिहारचे आमदार आणि  अकोला जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  राजेशकुमार घेणार आहेत. दोन्ही दिवस सकाळी ११ वाजता  होणार्‍या या बैठकीला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी, सकाळी ११ वाजता स्थानिक  स्वराज्य भवनात ही बैठक होणार आहे. संघटनात्मक  निवडणूक संबंधाने येथे महानगरातील काँग्रेस पदाधिकारी  आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शहरातील  पाचही ब्लॉकचे बीआरओंना येथे उपस्थित राहण्याचे  कळविले आहे.
बुधवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य  भवनातच पुन्हा दुसरी बैठक घेतली जाणार आहे. बुधवारी  अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या संघटनेबाबत  चर्चा केली जाणार आहे. शहरातील काँग्रेस कमिटीमधील  पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी २६ सप्टेंबरला, तर ग्रामीण  जिल्हा कार्यकर्त्यांनी २७ सप्टेंबरला उपस्थित रहावे, असे  आवाहन अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबनराव  चौधरी आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल  यांनी केले आहे.

Web Title: Meeting of the District, District Congress on 26-27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.