अकोल्याच्या औद्योगिक विकासासाठी पालकमंत्र्यांची विभागीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 03:34 PM2020-02-23T15:34:13+5:302020-02-23T15:34:18+5:30
मागील सत्कार समारंभात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात येथे चर्चा झाली
अकोला : अकोल्याच्या औद्योगिक विकासासाठी पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी अमरावतीच्या विभाग प्रमुखांची विभागीय बैठक अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात घेतली. या सभेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गुल्हाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, निखिल सरोदे आदी अधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील सत्कार समारंभात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात येथे चर्चा झाली. अकोल्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या यापुढे अशाच सोडविल्या जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री कडू यांनी दिले. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू, उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, नरेश बियाणी, नितीन बियाणी, निखिल अग्रवाल, आशिष खंडेलवाल, द्वारकादास चांडक, भरत शहा, पार्थ शहा, चेतन अग्रवाल, गिरीश जैन, कमलेश अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश गुप्ता, रूपेश राठी, संजय साबद्रा, संजय श्रावगी, शैलेश खटोड, किरीट मंत्री, विष्णू खंडेवाल, अमित बन्सल, विवेक डालमिया, महेंद्र पुरोहित, जय बांगड, प्रमोद खंडेलवाल, आशिष चांदराणी व ओमप्रकाश कासट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नितीन बियाणी यांनी मानले.