भारत वृक्ष क्रांती मिशनची बैठक संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:32 AM2021-02-18T04:32:43+5:302021-02-18T04:32:43+5:30
या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाला सर्व सदस्यांविषयी माहिती असावी आणि संस्थेचा काय हेतू आहे, याची माहिती व्हावी यासाठी ही ...
या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाला सर्व सदस्यांविषयी माहिती असावी आणि संस्थेचा काय हेतू आहे, याची माहिती व्हावी यासाठी ही बैठक घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक शन्मुग नाथन यांनी या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. या संस्थेचा हेतू संपूर्ण भारतात आठ हजार कोटी वृक्ष लावण्याचा असल्याचेही सांगितले. 'एक मूल एक झाड', 'एक जन्म एक झाड', 'एक विद्यार्थी एक झाड ', यासोबतच विविध उपक्रमांद्वारे आठ हजार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प 'अकोला पॅटर्न' या नावाने पूर्ण होणार असल्याचेही नाथन यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी डाॅ संजय तिडके, दाटे, धर्मेश केला, वाल्मीक भगत, सुरेशचंद्र जगताप, विशाल ढाकरगे, योगेश सोलंके, दीपक साबळे, अर्जुन सुरळकर, शरद वाघ आदी उपस्थित होते. संचालन आणि आभार प्रदर्शन पूजा पराळे यांनी केले.