मनपाची सभा ११ ऑगस्टला
By admin | Published: August 3, 2015 01:52 AM2015-08-03T01:52:07+5:302015-08-03T01:52:07+5:30
१७ विषयांवर होणार चर्चा.
अकोला: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, विषय सुचीवर तब्बल १७ विषयांचा समावेश करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शहर विकासाच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याने विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात १६ जुलै रोजी आयोजित स्थगित सर्वसाधारण सभेत मागील अकरा सभांच्या इतवृत्ताला मंजुरी देण्यात आली होती. सभेतही महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. आता पुन्हा ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३0 वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जनता भाजी बाजार, जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजार तसेच इतर ठिकाणच्या खुल्या जागा विकसित करण्यासाठी आरेखक नियुक्त करणे, नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्राप्त ७ कोटी रुपयांचे नियोजन करून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याचा समावेश आहे.