३१० कोटींच्या आराखड्यावर मुंबईत बैठक

By admin | Published: July 11, 2017 01:04 AM2017-07-11T01:04:54+5:302017-07-11T01:04:54+5:30

अकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला.

Meeting in Mumbai on the Rs 310 crore plan | ३१० कोटींच्या आराखड्यावर मुंबईत बैठक

३१० कोटींच्या आराखड्यावर मुंबईत बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. नवीन प्रभागात नेमक्या कोणत्या कामांची गरज आहे, यासह विविध मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या (मंगळवार) बैठकीचे आयोजन केले आहे. मनपा आयुक्त अजय लहाने सोमवारी मुंबईकडे रवाना झाले.
शहरालगतच्या २४ गावांचा मनपा प्रशासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडत होता. यामध्ये रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश होता. त्यामुळे मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरला. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव पाठवल्यानंतर शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४ गावांचे मनपामध्ये विलिनीकरणास शासनाने मंजुरी दिली. या नवीन प्रभागात मूलभूत सोयी-सुविधाची दाणादान उडाल्याचे चित्र आहे.
त्या पृष्ठभूमीवर सत्ताधाऱ्यांनी ३१० कोटींच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजूर केला. प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, त्यासंदर्भात ११ जुलै रोजी नगर विकास विभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Meeting in Mumbai on the Rs 310 crore plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.