शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:04+5:302021-09-06T04:23:04+5:30
यावेळी शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शरद जोशींवरील लघुपटाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. या कार्यकारिणीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा ...
यावेळी शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शरद जोशींवरील लघुपटाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. या कार्यकारिणीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी दिला. या कार्यकारिणीत शेतकऱ्यांनी शेती माल विक्रीसाठी व्यवस्था उभी करावी, यासाठी विक्री व्यवस्थापनातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यकारिणीस माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, कार्याध्यक्ष ललीत बहाळे, माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी, सीमाताई नरोडे, संजय कोले, सुधीर बिंदु, शैलाताई देशपांडे, मदन कामडे, वामनराव जाधव, अनंतराव देशपांडे, डॉ. आप्पासाहेब कदम, शशिकांत भदाणे, रामजीवन बोंदर, सुहासिनी वानखेडे, ज्योत्स्ना बहाळे यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
-------------
शेतकरी आंदोलनाची दिशा ठरणार!
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यकारिणीत राज्यातील शेती प्रश्नावर चर्चा करून शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष व या बैठकीचे संयोजक ललित बहाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बाबा देशमुख यांनी केले. या कार्यकारिणीच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत कौठकर, जसराज भैया बाहाळे, सतीश सरोदे, आकाश देऊळकर, अजित कळसकर, दिनेश गिर्हे, नीलेश नेमाडे, दिनेश देऊळकर, जाफर खां, गोपाल निमकर्डे, मंगेश रेळे, नीलिमा देशमुख, उज्वला पांडे, अंकिता धुळे, प्रिया देऊळकर, सुषमा नेमाडे, ज्योती डांगे, किरण कौठकर, निकिता धुळे, छाया भारसाकळे, अनुराधा खिरोडकार, संगीता कोडापे, संतोषी फाटे, मंजु नेमाडे, आदींनी परिश्रम घेतले.