पातूर तालुका समन्वय समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:22 AM2021-09-12T04:22:49+5:302021-09-12T04:22:49+5:30
या सभेत आमदार नितीन देशमुख यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण लक्ष्यांक व मंजूर विहिरी, घरकुल योजना अंतर्गत रोजगार सेवक ...
या सभेत आमदार नितीन देशमुख यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण लक्ष्यांक व मंजूर विहिरी, घरकुल योजना अंतर्गत रोजगार सेवक व लाभार्थी यांची सभा घेऊन घरकुल योजनेची कामे त्वरित मार्गी लावण्यास सांगितले. चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात वीजपुरवठ्यासाठी ट्रान्स्फाॅर्मर लावणे, अवैध दारूचे दुकान बंद करणे, तालुक्यातील २७ बंधाऱ्यांना भेटी देऊन सद्य:स्थितीची माहिती सादर करणे, नगर परिषदेला वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. तालुका क्रीडा संकुल, तालुक्यातील खराब झालेले रस्ते तथा पिंपळडोळी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिले, यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे, बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, तहसीलदार दीपक बाजड, गटविकास अधिकारी राहुल शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी डी. एस. शेटे यांच्यासह लघुसिंचन विभाग कृषी विभाग एकात्मिक बाल प्रकल्प विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक गटशिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाणीपुरवठा उपविभाग, बांधकाम उपविभाग, पाटबंधारे विभाग, तालुका पशुसंवर्धन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, मराविम कंपनी उपकार्यकारी अभियंता, पोलीस निरीक्षक आदी सभेला उपस्थित होते.