पदोन्नती समितीची बैठक बारगळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:35 AM2017-08-14T01:35:43+5:302017-08-14T01:36:58+5:30
अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचार्यांना पदोन्नती देण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी पूर्वनियोजित असलेली समितीची बैठक बारगळली. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती प्रशिक्षणासाठी जिल्हय़ाबाहेर असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यासाठीची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीची बैठक नियमितपणे होऊन कर्मचार्यांना पदोन्नती मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अंतिम बिंदूनामावली मंजूर असलेल्या विभागातील पदोन्नती पात्र कर्मचार्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीपुढे ठेवले जाणार आहेत. समिती पात्र प्रस्तावांची छाननी करून संबंधितांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेणार आहे. बैठकीत ४४ प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), समाजकल्याण अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांचा समावेश आहे. पदोन्नतीने भरावयाच्या पदांमध्ये सहायक प्रशासन अधिकारी-१, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-६, वरिष्ठ सहायक-७, कनिष्ठ सहायकांची ३0 पदे भरली जाणार आहेत. या पदांवर त्याखालील पदांच्या संवर्गातून पदोन्नती मिळणार आहे.
-