महापालिका सीमा विस्तार भागातील पाणी समस्येवर बैठक
By admin | Published: April 6, 2017 01:47 AM2017-04-06T01:47:40+5:302017-04-06T01:47:40+5:30
अकोला : महापालिका सीमा विस्तार झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, भौरद, डाबकी आदी परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली असून, त्याचा प्रत्यय पहिल्याच आमसभेत अनुभवास आला.
अकोला : महापालिका सीमा विस्तार झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, भौरद, डाबकी आदी परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली असून, त्याचा प्रत्यय पहिल्याच आमसभेत अनुभवास आला. त्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त विजय अग्रवाल यांनी बैठक बोलाविली. या बैठकीला विस्तारित झालेल्या परिसरातील नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच मनपा उपायुक्त समाधान सोळंके, नगर सचिव अनिल बिडवे, शहर अभियंता सुरेश हुंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या परिसरातील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर यांच्या विकास निधीतून पाणीपुरवठ्याची विकास कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन याप्रसंगी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले.
शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी कुंभारीचा पाणीपुरवठा बंद करून महानचा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी येथे केली. घाणेरडे आणि दूषित पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याचेही त्यांनी येथे सांगितले.
महानगरात आलेल्या सर्व नवीन परिसरातील पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती आणि सेवा नियमित केल्या जाईल, असेही महापौर विजय अग्रवाल यांनी बैठकीत सांगितले.