जिल्हा परिषद पदोन्नती समितीची अखेर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:40 AM2017-07-31T02:40:37+5:302017-07-31T02:40:37+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी समितीची बैठक येत्या ११ आॅगस्ट रोजी होत आहे. यावेळी ४४ पदांवर पदोन्नतीसाठी कर्मचाºयांच्या प्रस्तावांवर समिती निर्णय घेणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी समितीची बैठक येत्या ११ आॅगस्ट रोजी होत आहे. यावेळी ४४ पदांवर पदोन्नतीसाठी कर्मचाºयांच्या प्रस्तावांवर समिती निर्णय घेणार आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेत पदोन्नतीची दीडशेपेक्षाही पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामध्ये विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश आहे.
शासनाने २००१ च्या निर्णयानुसार, अनुशेष पूर्ण करण्यासाठी सरळसेवा आणि पदोन्नतीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी २००२ मध्ये त्या निर्णयाप्रमाणे पदोन्नती समिती गठित केलेली आहे. या समितीची बैठक नियमितपणे होऊन कर्मचाºयांना पदोन्नती मिळणे क्रमप्राप्त आहे; मात्र गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचाºयांच्या बिंदूनामावलीचा मोठाच घोळ झाला. तो निस्तारून पात्र कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी निर्दोष बिंदूनामावलीला विभागीय आयुक्तांची मंजुरी घ्यावी लागते. त्यानुसार ज्या विभागाच्या बिंदूनामावलीला अंतिम मंजुरी मिळाली आहे, त्या विभागातील पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाºयांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीपुढे ठेवले जाणार आहेत. समिती पात्र प्रस्तावांची छाननी करून संबंधितांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेणार आहे. ११ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत ४४ प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
पदोन्नतीची दीडशेपेक्षाही अधिक पदे रिक्त
जिल्हा परिषदेतील अराजपत्रित गट-ब, गट-क आणि गट-ड मिळून दीडशेपेक्षाही अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यातील गट-‘ब’मध्ये अंदाजे २३ ते २७, गट-‘क’मध्ये अंदाजे १५०, गट-‘ड’मध्ये पाचपेक्षाही अधिक पदे रिक्त आहेत. बिंदूनामावली अंतिम मंजुरीनंतर त्या सर्वांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची गठित समिती
जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), समाजकल्याण अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांचा समावेश आहे.
पदोन्नतीने भरावयाची पदे
पदोन्नतीने भरावयाच्या पदांमध्ये सहायक प्रशासन अधिकारी-१, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-६, वरिष्ठ सहायक-७, कनिष्ठ सहायकांची ३० पदे भरली जाणार आहेत. या पदांवर त्याखालील पदांच्या संवर्गातून पदोन्नती मिळणार आहे.