माेफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी गावागांवात ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:16 AM2021-06-14T11:16:47+5:302021-06-14T11:16:54+5:30
Meetings of Village Vigilance Committees : मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
-संतोष येलकर
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे; मात्र वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १० एप्रिल रोजी जिल्हयातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना दिले. त्यानुसार मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि निर्बंधांच्या परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरिब रेशन कार्डधारकांना दरमहा मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये राज्य शासनामार्फत गत मे महिन्यात मोफत धान्याचे वितरण करण्यात आले असून, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्य वाटप करण्यात येत असून, दिवाळीपर्यंत मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना गहू व तांदूळ इत्यादी धान्याचे मोफत वितरण करण्यात येत असून, रास्तभाव धान्य दुकानांमधून वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याची विक्री होणार नाही, गैरव्यवहार होणार नाही, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेऊन, जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले. त्यानुसार वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठका !
कोरोना काळात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना वितरीत करण्यात आलेल्या धान्याची विक्री, गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. संबंधित सरपंच तथा ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
कोरोना काळात जिल्हयातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना वितरीत करण्यात आलेल्या मोफत धान्याचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावांत ग्राम दक्षता बैठका घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार गावागावांत ग्राम दक्षता बैठका घेण्यात येणार आहेत.
बी.यू.काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी